New Year Poem In Marathi | New Year Marathi Kavita | Happy New Year 2020
*****
Latest New Year Poem In Marathi
ईतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो
तरीही त्यावर असतो
नव्या नवतीचा तजेला
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी
म्हणूनच ईतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ
नव्या स्वप्नांचा प्रारंभ
*****
Best New Year Poem In Marathi
प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
*****
Famous New Year Marathi Kavita
नेहमीप्रमाणेच येते
31st ची night
काही असतात खुश
तर काही होतात tight
प्रत्येकाचे अंदाज वेगळे
प्रत्येकाचा आनंद निराळा
तरीपण एकच असतो
नववर्षाचा आनंद कोवळा
काहीना 31st म्हणजे
असते full party
enjoy करता करता
जास्त होते ninty
कोणी girlfriend सोबत
कोणी just friend सोबत
उधळवितात रंग असे
जणू लपन्डावी औरत
DJ वर नाचणे म्हणजे
असते एक स्वर्गसुख
गाण्याच्या तालावर
मिळत एक नादसुख
नवे संकल्प करावे अन
सहजच विसरून जावे
नवीन वर्ष येता मग
मागचे संकल्प आठवावे
माहीतच नसत काय करू ?
का उगाच या वादळात मरू..?
वाहणारे असच वाहतात
मग तरनारा मी का मरू…?
काहीही असो
31st चा दिवस म्हणजे
न संपणारी अविरत night
सहज बाहेर पडत असते
खऱ्या आयुष्याची fight
*****
Join the Discussion!